चळवळीतले अनुभव – व्होडाफोन कॉल सेंटर
#मराठीबोलाचळवळ #अनुभव
आज आलेला अनुभव..
मी Vodafone पोस्टपेड मध्ये एक Callertune ठेवली होती पण काही तांत्रिक बिघाडीमुळे ते रुजू नव्हते झाले म्हणून मी तक्रार केली.
तक्रारीच निवारण करण्यासाठी मला चंदीगड मधून कॉल आला आणि तोच माणूस माझ्यासोबत हिंदीत बोलायला लागला, पण मी त्यासोबत मराठीतच बोलत होतो अगदी शेवटपर्यंत. म्हणजे मी काय बोलतोय हे त्याला कळत होत आणि तो हिंदीतीच बोलत होता. ज्याला मराठी कळत नाही तो लगेच बोलतो कि तुम्ही हिंदी किंव्हा इंग्लिश बोला, पण हा मनुष्य तसं काहीच नाही बोलला आणि हिंदीतच बोलत होता. यातून मला प्रत्यय आला की त्याने त्याची भाषा सोडली नाही आणि तो मराठी पण बोलला नाही.
शेवटी फोन बंद करताना त्याला म्हणालो महाराष्ट्रात जर कॉल करताय तर मराठीत बोला नाहीतर मराठी माणसाला अडचणी सोडवायला बसवा.
तसा मी vodafone ला मेल पण केलाय. आता त्यांच्या उत्तराची वाट पाहतोय.
तुम्ही खरच जो उपक्रम राबवत आहात त्यातून डोळे उघडलेत.
#म -मराठीचा
#महाराष्ट्रात मराठीतच बोला.
-विशाल पिलावरे , मुंबई, महाराष्ट्र.
{मराठी आमुची मायबोली पानाला आलेल्या संदेशातून}