चळवळीतले अनुभव – थाना नव्हे ठाणे!

अनुभव 209
thane_station

थाना नव्हे ठाणे
प्रसंग लोकल वारीचा
वेळ रात्री१०-१५ ची
स्थानक- कांजूरमार्ग मुंबई

माझे स्थानक भांडूप येणार म्हटल्यावर मी ठाणे गाडीत कांजूरमार्ग ला दारा जवळ येऊन उभा राहिलो तर एक माणूस (अर्थात मराठी माणूस) मला हिंदीत विचारतो की ‘ ही गाडी थाना जाणार का? तर मी सरळ सांगितले की थाना कुठल्या ग्रहावर आहे माहीत नाही, पण ही गाडी ठाणे येथे जाणार मग तो गाडीत चढला आणि म्हणाला की (अर्थात आता मराठीत) मी मराठीतून बोलतोय म्हटल्यावर बोलू लागला की ठाणे आणि थाना एकच आहे, मी म्हटलं मला फक्त ठाणे माहीत आहे, थाना अस कुठलेही गाव महाराष्ट्रात नाही मग त्याची चूक त्याला लक्षात आली आणि मी उतरत असतांना मला म्हणाला की आता इथून पुढे मरेपर्यंत ठाणेच बोलणार, मला ही आनंद झाला आणि मी परत एक सल्ला दिला की दादा मराठीतूनच बोलत चला, ते ही त्याला पटले.

अनेकदा, आपल्या सभोवती अनेक लोक आपल्या महाराष्ट्रातील नावांचा अपभ्रंश करतात, कळवा ह्याचं कलवा, पुणे ह्याचं पूना, धुळे ह्याचं धुलिया, टिळक नगर ह्याचं तिलक नगर. तेव्हा आपण त्यांना समजवून सांगायचं. एखाद्याने आपलं नाव कोणी चुकीचं उच्चारलं कि त्याला आपण समज देतोच ना? तशी महाराष्ट्रभूमीतील हि नावं आपलीच आहेत. त्यांना जपणं हेही आपलं कर्तव्य आहे. आणि आपलं कर्तव्य आपण बजावायलाच हवं.

आपल्यालाही अशी लोकं पदोपदी भेटतच राहणार आपण मात्र मराठीतच बोलायचं, आपण जर परभाषेत बोललो तर मराठी कशी वाढेल? मुंबई हि महाराष्ट्राची राजधानी इथे बिनधास्त मराठी बोला!!

– पुरुषोत्तम इंदानी

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

2 Comments

 1. पुरुषोत्तम इंदानी

  खूपच छान वेब साईट बनवली

  1. mm

   मायबोली प्रशासक

   उदंड आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: