कथा प्रशांतची – कॉल सेंटरहून आलेल्या कॉलवर मराठीत का बोलावे?

कथा 206
Call center Marathi

सकाळचे ६ वाजले होते.प्रशांत नुकताच पर्वतीखालच्या वस्तीतल्या आपल्या भाड्याच्या घरात परत आला होता. ४ महिन्यापूर्वीच मोठ्या कष्टाने लागलेल्या कॉल सेंटरच्या नोकरीमुळे जरा बरे दिवस आले होते.आता त्याने गावाकडल्या धाकट्या भावाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती.नोकरी रात्रीची असल्यामुळे बारावी नंतर परिस्थितीमुळे अर्धवट राहिलेले शिक्षण पुढे चालू करण्याचा त्याचा विचार होता.महिन्याला ८-१० हजार मिळत होते. वाईजवळ वसलेल्या त्याच्या मूळ गावी तेवढंही मिळत नव्हतं.

रात्रभर नोकरी करूनही आज त्याची झोप उडाली होती.कारणही तसेच होते. त्याला आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या ३-४ जणांना पुढच्या १० दिवसाचा पगार देऊन कामावरून कमी केले होते.प्रशांत आणि साथीदार कॉल सेंटरच्या मराठी विभागात होते.कितीतरी वेळा सुरवात मराठीत करूनही समोरचे लोक मराठीत बोलत नसत.ह्या महिन्यात असे प्रकार बऱ्याचदा झाले आणि कंपनीने मराठी विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला.आता पुढे काय होणार हीच चिंता मनाला सतावत होती.

आपण कॉलसेंटर वरून आलेल्या कॉलला हिंदीतून उत्तर देतो आणि एकप्रकारे मराठी भाषेला आणि त्याच्या बाजारपेठेला आकुंचित करतो. आपण हि मराठीची गळचेपी स्वतःच्या हाताने करतोय. आपल्या या कृतीमुळे आपण महाराष्ट्रात मराठीची गरज नाही असा संदेश कंपन्यांना देत असतो आणि या सर्व माहितीच्या आधारावर या कंपन्या असा निष्कर्ष काढतात कि मराठी भाषेतून व्यवहार होत नसल्याने मराठी जाहिराती, मराठी सेवा पुरवण्याची गरज नाही याचा फटका सर्व मराठी भाषिकांना बसतो कारण या कृतीने संपूर्ण मराठी परिसंस्था मोडीत काढत आहोत आणि त्याचं लवकर भरून न येणारं नुकसान करत आहोत.

उद्यापासून परत नोकरी शोधावी लागणार होती पण त्यासाठी परत पायपीट होतीच.बऱ्याच कॉल सेंटरला अशीच परिस्थिती होती.विचार करता करता बसल्या बसल्या प्रशांतला कधी झोप लागली कळलेच नाही.

जाग आली तेव्हा त्याचा रूममेट ऑफिस ला जायला निघत होता.
“निघतोय रे.चहा करून ठेवलाय पिऊन घे”.
अचानक रूममेटचा फोन वाजला.

“हॅलो कौन बोल रहा है? पर्सनल लोन? सर नही चाहिये.क्यों सुबह सुबह दिमाख खाते हो?”
आणि अचानक दरवाजा उघडून निघूनही गेला.प्रशांत त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिला……

कॉल सेंटरहून येणाऱ्या प्रत्येक कॉलवर मराठीतच बोला.प्रशांतसारख्या मुलांना जॉब मिळू शकतो.

तात्पर्य

आपण कॉलसेंटर वरून आलेल्या कॉलला हिंदीतून उत्तर देतो आणि एकप्रकारे मराठी भाषेला आणि त्याच्या बाजारपेठेला आकुंचित करतो. आपण हि मराठीची गळचेपी स्वतःच्या हाताने करतोय. आपल्या या कृतीमुळे आपण महाराष्ट्रात मराठीची गरज नाही असा संदेश कंपन्यांना देत असतो आणि या सर्व माहितीच्या आधारावर या कंपन्या असा निष्कर्ष काढतात कि मराठी भाषेतून व्यवहार होत नसल्याने मराठी जाहिराती, मराठी सेवा पुरवण्याची गरज नाही याचा फटका सर्व मराठी भाषिकांना बसतो कारण या कृतीने संपूर्ण मराठी परिसंस्था मोडीत काढत आहोत आणि त्याचं लवकर भरून न येणारं नुकसान करत आहोत.

-निखिल मनोहर

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

एका मराठी संवादाची गोष्ट!
कृपया पूढील संवाद लक्षपूर्वक वाचा👇 - हॅलो, भोसले सर बोलत आहात का? (हिंदीत सुरू) (इथं त्यांनी गृहीत धरलेय बरं का महाराष्ट्रात मराठी आडनावाच्...
मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
स्वतंत्र देशात मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: