गोष्ट उपाहारगृहातली – बदल घडत नसतो घडवावा लागतो

कथा 67
गोष्ट उपाहारगृहातली

बदल…घडत नसतो घडवावा लागतो.

त्या दिवशी उपाहारगृह तसे रिकमेच होते.सार्वजनिक सुट्टी असल्याने लोक घरीच होते.
असेच दोन दिवस गेले.
परत वर्दळ सुरू झाली.
टेबल क्रमांक ४ आणि ५ ला फारशी गर्दी नव्हती.लोक यायचे,वस्तू सूची बघून परत बाहेर जायचे.
तिसऱ्या दिवशी मालकांना कळेना म्हणून मालकांनी त्या टेबलचा ताबा असलेल्या माणसाला बोलावले.

हा संवाद परभाषेत होता (इथे मराठीत देत आहे)
“काय रे आज तुझ्या टेबल वर फक्त ४ लोक,नक्की काय होतंय?”
“मला माहित नाही साहेब. मी आलेल्याना फक्त काय हवंय हे विचारतोय,ते विचारताच गिऱ्हाईक बाहेर जात आहेत”

“असं म्हणतोस? बरं तू एक काम कर आजपासून टेबल ७ आणि ८ घे आणि त्या रितेश ला टेबल ४ आणि ५ ला बघू दे.”

“ठीक आहे साहेब”.

तो दिवस तसाच गेला.
टेबल क्रमांक ४ आणि ५ ला गर्दी होती. आता ओस पडायची पाळी टेबल क्रमांक ७ आणि ८ वर आली होती.

परत २ दिवस गेले आता मात्र हद्द झाली होती. टेबल क्रमांक ७ आणि ८ चे बाहेर गेलेले रोजचे गिऱ्हाईक इतर टेबल वर बसत होते पण ते रिकामे नसेल तर बाहेर रांगेत वाट बघत होते.

टेबल ७ आणि ८ वर कोणीच जाईना.
रविवार उजाडला, त्या दिवशी परत संध्याकाळी जेव्हा बाहेर रांग लागली होती तेव्हा टेबल ७ आणि ८ रिकामेच होते.

“साहेब? मला कळत नाहीये काय होतंय..एक काम करा ना,बाहेर उभे आहेत त्यांना जरा विचारा ना काय अडचण आहे इथे बसायला?”
आता मालक स्वतः बाहेर पडले आणि रांगेत असलेल्या पहिल्या कुटुंबाला विचारले.तेव्हा कुटुंबाकडून उत्तर आले त्याने ते चाट पडले

२ महिन्यानंतर….

आज टेबल क्रमांक ७ आणि ८ वर परत तोच माणूस असताना तशीच गर्दी होते.
कारण मालकाने गिऱ्हाईकांनी दिलेल्या उत्तराचा विचार केला.
शेवटी गिऱ्हाईक राजा असतो.तो आनंदी तर सगळेच आनंदी.

नक्की काय झाले होते त्या दिवशी?? काही अंदाज लावू शकताय??

“हे बघ मला कळलंय काय अडचण आहे इथे.गिऱ्हाईकांना तुझी भाषा समजत नाही.त्यामुळे तू आलेल्या गिऱ्हाईकला परभाषेत काही विचारले तर तो बाहेर उठून जातो.मी ह्यावर विचार केला आणि मला त्यांचे म्हणणे पटतंय. मी आधीच १० दिवस फार नुकसान सोसलंय आणि ह्यापुढे ते मला परवडणार नाही.तुला गरज होती तेव्हा मी नोकरी दिली पण आता अशी अडचण फक्त एकाच गोष्टीने सुधारू शकेल.तू इथली भाषा शिकून घ्यावीस. माझ्या ओळखीचे शिकवणी वाले आहेत.अर्धा खर्च मी करेन आणि अर्धा खर्च तू.

“हे बघ मला कळलंय काय अडचण आहे इथे.गिऱ्हाईकांना तुझी भाषा समजत नाही.त्यामुळे तू आलेल्या गिऱ्हाईकला परभाषेत काही विचारले तर तो बाहेर उठून जातो.मी ह्यावर विचार केला आणि मला त्यांचे म्हणणे पटतंय. मी आधीच १० दिवस फार नुकसान सोसलंय आणि ह्यापुढे ते मला परवडणार नाही.तुला गरज होती तेव्हा मी नोकरी दिली पण आता अशी अडचण फक्त एकाच गोष्टीने सुधारू शकेल.तू इथली भाषा शिकून घ्यावीस. माझ्या ओळखीचे शिकवणी वाले आहेत.अर्धा खर्च मी करेन आणि अर्धा खर्च तू.
मी खरे तर कामावरून कमी करू शकलो असतो पण माणूस म्हणून मी तुझी परिस्थिती जाणतो.”

त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू आले.त्याने दुसऱ्या दिवशीच शिकवणी सुरु केली आणि आज तो इथल्या संस्कृतीचा एक भाग आहे.

तुम्ही जेव्हा बरेच वर्ष इथेच रहात असलेल्या एखाद्या माणसाशी आपल्याच राज्यात परभाषेत बोलता तेव्हा निदान तुम्हींतरी स्वतः पाहुणे बनता नाहीतर त्याला अजूनही परके मानता.
लोकांना आपलेसे करा आपल्या संस्कृतीने.

आपल्या राज्यात आपल्या भाषेची मागणी करा.भारताची विविधता जतन करा.

– निखिल मनोहर

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
चळवळीतले अनुभव - थाना नव्हे ठाणे!
थाना नव्हे ठाणे प्रसंग लोकल वारीचा वेळ रात्री१०-१५ ची स्थानक- कांजूरमार्ग मुंबई माझे स्थानक भांडूप येणार म्हटल्यावर मी ठाणे गाडीत...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: