२०३६ चे पुने (पुणे)

कथा 122
Pune

20 वर्षांनी अगदी आनंदात आपल्या रूम मधून बाहेर आलेल्या आपल्या 20 वर्षाचा मुलाला त्याच्या बाबानी हाक मारली.

” काय रे आज एकदम खुश? आज काय खास?”

” हाहा हो कारणही तसेच आहे बाबा.बाबा आज मला एक छान स्वप्न पडलेले.म्हणजे अगदी 2007-08 वर्षात गेल्यावर कसे होईल ना तसेच.एका रेल्वे स्थानकावर गेलो होतो.बहुतेक खडकी असावे .खरंच सगळीकडे मराठी पाट्या होत्या.अगदी उद्घोषणा सुद्धा मराठीत होती.तिथून पुढे गेलो.बाहेर लागलेल्या मोबाईल कंपनीच्या जाहिराती पण मराठीत होत्या.
एवढेच काय पुढे डेक्कन ला ‘पितले ब्रदर्स मिठाईवाला’ ची पाटी पण मराठीत होती.पुढे गावात गेलो.काही लोणची घ्यायची होती.
‘बेदेकर आचार’ देना म्हणालो तर काही कळेना म्हणून मग समोर तसेच काहीसे लिहिले एक लोणचे दिसले ते घेतले.बहुदा त्या काळात तसे काहीसे नाव असावे.
त्याकाळात मेट्रो नव्हती म्हणून पी एम टी मध्ये बसलो.
सगळे कंडक्टर आगे चलो च्या ऐवजी पुढे चला म्हणत होते आणि लोकांना पण ते समजत होते.
मला काय करावे सुचेना.कंडक्टर मराठी बोलू शकतो हेच मला रुचत नव्हते.पुढे ‘बडा बाजार’ ला उतरलो त्या काळात त्याला मंडई असे का काहीतरी म्हणत असावेत कारण कंडक्टर असेच काहीसे बोलत होता.
त्या बडा बाजारात भाजी घेतली.समोर एक उसाच्या रसाचे दुकान होते.आतासारखे ganney का रस असे काही लिहिले नव्हते.ते झाल्यावर त्याला 10 रुपये दिले आणि दहा हा शब्द पण त्याला कळला. तिथून परत येण्यासाठी अजून एका पी एम टी मध्ये बसलो.योगायोग असा कि तो वाहक सुद्धा मराठीच होता.बस ची पाटी सुद्धा आता सारखी ‘पाशान’ नव्हती अगदी ‘पाषाण’ असे लिहिले होते.डेक्कन ओलांडून थोडा पुढे गेलो.
तेवढ्यात शेजारी ‘पुने हवाई अड्डाची बस’ आली त्याला चक्क ‘विमानतळ’ असे लिहिले होते.तेव्हा म्हणे दिवसाला 7 का 8 फेऱ्या होत्या बस च्या.
मग कंटाळा आला म्हणून रेडिओ लावला.आश्चर्य म्हणजे तिथे रेडिओ जॉकी पण मराठी बोलत होते.आता मात्र खरंच मी स्वप्न बघतोय ह्याची खात्री पटली.धाडकन जागेवरून उठलो आणि चिमटा काढला स्वतःला.
खरंच स्वप्न होते ते.एक सुंदर स्वप्न.
असे म्हणतात पहाटे पडलेली स्वप्न पूर्ण होतात.
माझेही होईल काहो स्वप्न पूर्ण ?

इतके कसे बदलले सगळे? म्हणजे मला बाहेर गेल्यावर आज मराठी बोर्डस दिसत नाहीत.कुठल्या कंपनी ने चुकून पोस्टर लावले कि त्यावर कोणी येऊन काळे फासते किंवा फाडले जाते.कंडक्टर मराठी दिसत नाही कारण असा कायदाच आपल्याकडे आता अस्तित्वात नाही.आपापल्या एकेकाळच्या प्रसिद्ध ब्रॅण्ड्सनी आपली नावे थोडीशी बदलली आहेत.बँकेत मराठी नाही.टीव्ही वर मराठी कार्यक्रमात सगळी मराठीच पात्रे मिळतील याची शाश्वती नाही.काय काय झालाय नक्की ह्या गेल्या 20 वर्षात?”

बाबांनाही जुने दिवस आठवून गहिवरून आले होते.

” अरे बाळा,तुझे स्वप्न जगलोय मी काही वर्षांपूर्वी.देवनागरी,देवनागरी करत, हळू हळू आपल्यावर हिंदी लादणाऱ्या लोकांना आपणच दुर्लक्ष केले आणि अशाने आपण मुंबई सोबत पुणेही आता गमावून बसलोय.आपली लोकं इतकी भाबडी होती कि त्यांनी आपली भाषाच बदलली.घरी काय ते मराठी, बाहेर पडलो कि हिंदीच.त्यात हिंदी सिनेमे,लहानपणापासून बघत आलेली हिंदी कार्टून,रेडिओ,
आय टी एरिया ह्यांनी अधिकच भर घातली.बाहेरून येणाऱ्या प्रत्येक स्थलांतरित माणसाला मराठी शिकवण्यापेक्षा काळाची गरज असे स्वतःच्या मनाला सांगत आपण आपली भाषा बदलली.

डोळ्यादेखत हळू हळू सगळे बदलत जाताना आपण मात्र बघत बसलो.बाहेरची मातृभाषा वाचवणे हे ‘जाऊ दे ना मला काय करायचंय’ असे म्हणत म्हणत आणि ‘बदलत आहेत तर बदलूदेत’ असा संकुचित विचार करत हा दिवस उजाडला आहे.
आता मागे पहिले तर तेव्हाच काहीसे केले असते तर बाहेरची मराठी आपण वाचवू शकलो असतो……

(आपल्याला ही अतिशयोक्ती वाटत असल्यास वाचून जरूर पुढे जा आणि वाटत नसल्यास आठवा 20 वर्षांपूर्वीची मुंबई आणि आताची. कितीसा मराठी टक्का आहे आणि असलेला मराठी टक्का बाहेर पडल्यावर किती मराठी बोलतो?)

– निखिल मनोहर

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: