चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश, एअरटेलचे संदेश महाराष्ट्रात मराठीत सुरु

चळवळीचं यश 58

बदल घडत नाही, घडवून आणावा लागतो!
#मराठीबोलाचळवळ
कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर महाराष्ट्रात एअरटेलचे संदेश मराठीत यायला सुरुवात.

महाराष्ट्रात हिंदीच्या अतिक्रमणामुळे आपल्याला हिंदीची भरपूर सवय झालीये, आणि ती सवय लवकर जात नाही त्यामुळे महाराष्ट्रात मराठीशिवाय चालून जाते असे काही जणांना वाटते.आता टेलिकॉम कंपन्यांनाच पहा ना, TRAI चा राज्यभाषा वापरण्याचा नियम असतानाही अनेक नियम धाब्यावर बसवतात आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना हिंदीची सवय झाली असल्यामुळे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते पण आपल्या महाराष्ट्रात अजूनही बरेच जागरूक नागरिक आहेत जे #मराठीबोलाचळवळ #मराठीएकीकरणसमिती अश्या अनेक मराठीच्या वापरासाठी आग्रही असणाऱ्या चळवळी आहेत. या चळवळीच्या विविध कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून वर्षभर एअरटेलच्यामागे मराठी संदेश हवे असा तगादा लावून धरला आणि अखेरीस त्याला यश आले आणि एअरटेलचे संदेश मराठीत येणे सुरू झाले. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीनुसार प्रत्येक मराठी माणसाने अशा लहान लहान गोष्टीत मराठीचा आग्रह धरला तर महाराष्ट्राचं मराठीकरण निश्चितच होईल.

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
चळवळीतले अनुभव - थाना नव्हे ठाणे!
थाना नव्हे ठाणे प्रसंग लोकल वारीचा वेळ रात्री१०-१५ ची स्थानक- कांजूरमार्ग मुंबई माझे स्थानक भांडूप येणार म्हटल्यावर मी ठाणे गाडीत...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: