डिस्कव्हरी वाहिनी आता मराठीत!

चळवळीचं यश 74

डिस्कव्हरी वाहिनी आता मराठीत!

सर्वांसाठी एक आनंदाची बातमी! आता डिस्कव्हरी वाहिनी देखील मायबोली मराठी भाषेत उपलब्ध होणार आहे!ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत ही सेवा सुरू होईल, अशी घोषणा डिस्कव्हरी वाहिनीच्या दक्षिण आशियाच्या व्यवस्थापक मेघा टाटा यांनी ट्विटर वरून केली आहे.

हे केवळ आपल्या सर्वांचा आग्रह,मराठी बोला चळवळ,मी मराठी एकीकरण समिती व मराठीच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था व मराठी प्रेमी यांच्यामुळेच शक्य झाले आहे…

आता आवश्यकता आहे ती ही सेवा सुरू झाल्यावर त्या सेवांचा लाभ घेण्याची व त्यांना  उत्तम प्रतिसाद देण्याची, जर या सेवांना योग्य टीआरपी लाभला नाही तर ह्या सेवा बंद होतील! जसे हिस्टरी tv18 च्या बाबतीत घडले होते. यांनी देखील काही वर्षांपूर्वी मराठी भाषेत सेवा उपलब्ध करून दिली होती परंतु प्रेक्षकांचा लाभलेला कमी प्रतिसाद यामुळे त्यांनीही तेव्हा परत मागे घेतली त्यामुळे असे उपलब्ध झाल्यावर त्यांचा लाभ करून घेणे हे आपले कर्तव्य आहे. हिंदी हे काही आपली राष्ट्रभाषा नाही भारतीय राज्यघटनेनुसार सर्व 22 भाषा समान आहेत त्यामुळे हिंदी भाषेला नाकारणं हा काही गुन्हा नाही आपण हिंदी भाषेचा द्वेष करत नाही तर हिंदी भाषेला विरोध करून आपल्या भाषेत सेवा मिळण्यासाठी मागणी करत आहोत हे काही गैर नाही  आपल्या भाषेत सेवा मिळण्यासाठी मागणी करणं हा आपला संविधानात्मक अधिकार आहे!

अजून अशा बऱ्याच वाहिन्या आहेत की ज्या देखील मराठीत उपलब्ध होऊ शकते तरी मराठीत उपलब्ध होण्यासाठी आपण त्या वाहिन्यांकडे मागणी करण्याची आवश्यकता आहे यासाठी आपण त्यांना ई-मेल पाठवू शकतो त्यांच्या ग्राहक सेवा प्रतिनिधींना कॉल करून तशी मागणी करू शकतो…

सध्या सोनी याय ही कार्टून वाहिनी मराठी भाषेत उपलब्ध आहे वआता अशा अजून बऱ्याच वाहिन्या आहेत की त्या देखील मराठीत येऊ शकतील यासाठी आपण आग्रह व मागणी करण्याची आवश्यकता आहे. पोगो, कार्टून नेटवर्क  , डिज्नी चॅनेल, हंगामा, नॅशनल जिओग्राफी, हिस्टरी tv18, स्टार स्पोर्ट्स या सर्व वाहिन्या आपल्या मायबोली मराठीत उपलब्ध व्हावे म्हणून आपण सर्वांनी मागणी करण्याची आवश्यकता आहे व केवळ मागणी करणे पुरेसे नाही तर या सर्व भाषा हिंदी भाषेत उपलब्ध आहेत या वाहिन्यांचे हिंदी भाषेतील मनोरंजन जर आपण नाकारले तर निश्चित लावायला आपल्याला आपल्या मायबोली मराठी भाषेत उपलब्ध होतील असे या वाहिन्या दक्षिण भारतातील इतर भाषांमध्ये उपलब्ध आहेत.

आपल्या टीव्हीवरील वाहिनीची भाषा बदलण्यासाठी सेट अप बॉक्स चा रिमोट वरील निळे बटन दाबून आपण भाषा बदलू शकतो.

 

आशिष अरुण कर्ले.

९७६५२६२९२६

ashishkarle101@gmail.com

मी मराठी एकीकरण समिती

मराठी बोला चळवळ

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे!
मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे! काही लोक भाषेची व्याख्या ही भाषा म्हणजे केवळ एक संवादाचं माध्यम आहे अशी करतात. माझ्या मते ही व्याख...
मराठी भाषेच्या पराभवाची कारणे
मराठी भाषा माघारत जाण्याचे मुख्य कारण म्हणजे मराठी लोकांची 'दैनंदिन जीवनात स्वतःची भाषा सोडून इतर भाषांचा वापर करण्याची सवय!' आहे. या सवयीमुळे मर...
बेळगाव सीमाप्रश्न - कणा मोडलेला महाराष्ट्र...  
पुन्हा १७ जानेवारीचा दिवस उजाडणार आणि पुन्हा सीमावासीयांची भळभळती जखम उघडी होणार. संयुक्त महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थाने पहिले रक्त सांडले गेले ते...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: