एका मराठी संवादाची गोष्ट!

अनुभव चळवळ 19
कृपया पूढील संवाद लक्षपूर्वक वाचा👇
– हॅलो, भोसले सर बोलत आहात का? (हिंदीत सुरू)
(इथं त्यांनी गृहीत धरलेय बरं का महाराष्ट्रात मराठी आडनावाच्या सर्व लोकांना हिंदी बोलता येते)
काय करावे चूक  आपलीच आहे ना, आपलेच लाचार लोक हिंदीत सुरू करतात आणि मराठीची मागणी करत नाहीत..)
असो पुढे वळू….
– नमस्कार, हो मी भोसले बोलतोय,आपण कोण?
– सर मी डिश टीव्ही कडून फलाना फलाना बोलत आहे, तुमचा मेल आला होता चॅनेल बद्दल तक्रार होती. (हिंदीतच)
– मला समजत नाही तुम्ही काय बोलताय? मराठीत कॉल उपलब्ध करून द्या.
– सर तुम्ही बोलताय ते समजत नाही. (हिंदीतच)
– मराठी कॉल, मराठी कॉल………कुल्ड यू प्लिज अरेंज कॉल इन मराठी? (मराठीत बोलू शकता का?)
– सर नो प्रॉब्लेम यू कॅन् स्पीक् इन् इंग्लिश्  (इंग्रजीत बोलाल का?)
– आय् सेड् आय् वॉन्ट् कॉल् इन् मराठी ( मी म्हणालो मराठीत कॉल पाहिजे)
– ओके सर, नो प्रॉब्लेम् विल् अरेंज् कॉल् इन् मराठी, थँक् यू. ………. (ठीक आहे सर,आम्ही व्यवस्था करू)
* बरोबर ५ मिनिटांनी *
– हॅलो, माझे बोलणे भोसले सरांशी होत आहे का?
– नमस्कार, हो बोलतोय.
-सर मी डिश टीव्ही कडून संकेत बोरकर बोलत आहे, आपण मराठीत कॉलची विनंती केली होती.
– हो.
–  सर आज तुमचा मेल मिळाला होता स्टार स्पोर्ट्स मराठी चॅनेल ऍक्टिवेट करण्यासाठी.
–  हो, काल स्टार ने मराठीत वाहिनी सुरु केली आहे, आपण अजून आपल्या यादीमध्ये जोडले नाही वाटतं, कारण मी तपासले असता मराठी स्टार असे काहीही दिसत नाही, कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
–  सर १ मिनिट द्या चेक करून सांगतो.
–  ठीक आहे
– सर सध्या तरी इथे सुद्धा असा चॅनेल दिसत नाही, मी वरिष्ठांकडे तुमचा फीडबॅक पाठवतो.
–  लवकर करा आम्हाला स्टार मराठीत पाहिजे अन्यथा तुमची सेवा बंद करू.
– सर नक्कीच तुमची समस्या समजू शकतो, आपण निश्चिंत राहावे लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करू.
– ठीक आहे.
– याव्यतिरिक्त आणखीन काही मदत हवी आहे का?
–  नाही. इतकंच करा.
– सर आणखी एक गोष्ट बोलू का?
– हो बोला..
– तुम्ही मराठीत कॉल ची मागणी केली म्हणून ही तक्रार आमच्याकडे आली, हल्ली मराठीत कॉल ची मागणी वाढली आहे त्यामुळे आमच्या कडे जास्त कॉल ट्रान्सफर होत आहेत.
– अरे वा ! छानच आहे की, तूमचं काम वाढलं म्हणायचं
– काम वाढले तर बरं आहे सर नोकऱ्या टिकतील आमच्या.
– हो ते पण खरं आहे, काम तर आपल्या मराठी मुलांनाच मिळाले पाहिजे.
–  हो सर, मागच्या २ महिन्यात ६ नवीन मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या मराठीत कॉल ची मागणी वाढल्यामुळे.
–  खूपच छान, आनंद आहे याचा.
–  असेच सर्वांनी मराठीत बोलावे सर मी पण मराठी आहे, समोरचा व्यक्ती मराठीत बोलला की बरं वाटतं.
– अगदी बरोबर
_________________________________________________________________________________
मित्रांनो आपण मराठीत संवाद साधल्यामूळे मराठी मुलांना नोकरी मिळायला मदत होऊ शकते. हे आतापर्यंत तूमच्या लक्षात आलंच असेल! तेंव्हा आता न घाबरता, न लाजता प्रत्येक ठीकाणी मराठीतच बोला.🙏🙏🙏
सहमत असाल तर,
हा संदेश प्रत्येक मराठी माणसा पर्यंत पूढे पाठवा🙏
-सुयोग परब
#मराठीबोलाचळवळ
mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

इंग्रजी माध्यमाच्या शाळा हिरावून घेतायत मुलांचं बालपण?
​काल परवाची गोष्ट आहे. आदल्या दिवशीच्या जागरणामुळे उठायला थोडासा उशीर झाला. रोजची कामे आटपुन मी बाजारात गेलो तो पर्यत दुपार झाली होती. बाजारपे...
हिंदीच्या दडपशाहीविरोधी चळवळ उभी करावी लागेल
"चिं. वि. जोशींची भविष्यवाणी खरी ठरली" - ' चिं. वि. जोशी ' यांच्या 'संचार' या पुस्तकात, त्यांनी या पुस्तकात १९१४ ते १९४३ पर्यंतच्या तीस वर्षाच...
चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश, एअरटेलचे संदेश महाराष्ट्रात मराठीत सुरु
बदल घडत नाही, घडवून आणावा लागतो! #मराठीबोलाचळवळ कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर महाराष्ट्रात एअरटेलचे संदेश मराठीत यायला सुरुवात. महाराष्ट्र...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: