कॅनडातील क्विबेक प्रांताने जगासमोर ठेवला स्वभाषा जपण्याचा आदर्श

चळवळ 159
parliament_building_quebec_city_at_night_shot

क्विबेक हे कॅनडामधलं एक फ्रेंच बहुभाषिक प्रांत. अर्थात राज्यभाषाही फ्रेंच.
काल गुरुवारीच क्विबेक विधीमंडळाने दुकानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेबद्दल मोठा निर्णय घेतला. सर्व दुकान मालकांना सांगण्यात आलं की ग्राहक दुकानात आल्यावर आपण त्यांचं स्वागत करता, तेव्हा इंग्रजीत हाय (Hi), हॅलो न बोलता फक्त फ्रेंचमध्ये बोहजोर (Bonjour) बोलावे.

हा मुद्दा समोर यायचं कारण म्हणचे क्विबेकचं सर्वात मोठं शहर मॉंटट्रियाल येथे द्विभाषिक वातावरण निर्माण झाले होते. आकडेवारी सांगते की शुभेच्छा देण्यात फ्रेंच भाषेचा वापर २०१२ मध्ये ८९% होता तो आज ७४% वर आला आहे. आणि म्हणून असं ठरवलं की आतापासून दुकानदारांची प्राथमिक भाषा फक्त फ्रेंच असावी..!

निर्णयाची पार्श्वभूमी
हा मुद्दा समोर यायचं कारण म्हणचे क्विबेकचं सर्वात मोठं शहर मॉंटट्रियाल येथे द्विभाषिक वातावरण निर्माण झाले होते. आकडेवारी सांगते की शुभेच्छा देण्यात फ्रेंच भाषेचा वापर २०१२ मध्ये ८९% होता तो आज ७४% वर आला आहे. आणि म्हणून असं ठरवलं की आतापासून दुकानदारांची प्राथमिक भाषा फक्त फ्रेंच असावी..!

महाराष्ट्रातील परिस्थिती
ही बातमी सांगायचा मुद्दा हाच की आज अपल्याला दुकानांवर मराठी पाटी असली तरी समाधान वाटतं (काही बुद्धिवादी त्यालाही विरोध करतात, त्यांचं सोडा) आपल्या इथे ग्राहकाचं स्वागत करायची पद्धतच नाहीय म्हणा.. तरी पुढे दुकानदार आपल्याशी कोणत्या भाषेत बोलतो ह्यावर सगळेच जण लक्ष ठेवत नाही.

अनेकांनी पहिल्यांदाच नाव ऐकलं असेल असं हे क्विबेक प्रांत, त्यांचा दुकानदार आपल्याशी Hi! बोलतोय का Bonjour इतकं बारीक लक्ष आहे.. आणि त्याविषयी शासनही पाठपुरावा करत आहे.
आपलंही सर्वत्र अशा बारीक सारीक गोष्टींवर लक्ष असावं हेच ह्यातून शिकण्यासारखे!!

Quebec news

Quebec news

-महेश मोगरे

टीप: वरील चित्रात दिसणारी इमारत ही क्विबेक सिटी येथील विधिमंडळाची इमारत आहे

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
चळवळीतले अनुभव - थाना नव्हे ठाणे!
थाना नव्हे ठाणे प्रसंग लोकल वारीचा वेळ रात्री१०-१५ ची स्थानक- कांजूरमार्ग मुंबई माझे स्थानक भांडूप येणार म्हटल्यावर मी ठाणे गाडीत...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: