ग्राहकांचे भाषिक अधिकार

चळवळ 70

ग्राहकांचे भाषिक अधिकार

“जशी मागणी तसा पुरवठा” या उक्तीप्रमाणे, जर ग्राहकांची मागणी असेल आणि ती रास्त असेल तर उत्पादकांना – सेवाकर्त्यांना त्याची पूर्तता करावी लागते. ग्राहकाच्या दृष्टिकोणातून उत्पादन – सेवेचे अनेक पैलू आहेत, त्यापैकी एक म्हणजे भाषा. उत्पादन – सेवा तक्रारीसाठी अनेक ग्राहक संघ आहेत पण त्यापैकी भाषेच्या पैलूने विचार करणारे संघ तुरळक किंवा जवळपास नसल्यात जमा आहेत. कारण, आपल्या भाषेत सेवा हि कल्पना अजूनही लोकांच्या मनात रुजलेली नाही.

आपण कित्येकदा भाषेच्या मागणीकडे दुर्लक्ष करतो परंतु ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण, भाषा हिच उत्पादनाला – सेवेला ग्राहकांपर्यंत पोहोचवते आणि तीच नसेल तर उत्पादन – सेवेची माहिती ग्राहकाला – वापरकर्त्याला व्यवस्थित मिळत नाही. मराठीजणांना जरी ईतर भाषा अवगत असल्या तरी उत्पादन – सेवा मायबोलीत असल्यास ते वापरणं आणि त्याबद्दलची माहिती मिळणं सोप्पं जाईल आणि उत्पादन – सेवेचा परिपूर्ण वापर करता येईल.

एक ग्राहक म्हणून आपण खालील क्षेत्रांत आपल्या भाषेची मागणी करु शकता.

  • बॅंका, विमा सेवा
  • वाहतूक सेवा
  • ‎अन्न-तोय (Food and Beverages) उत्पादने
  • उत्पादन – सेवा जाहिराती
  • मनोरंजन सेवा
  • मोबाईलच्या/संकेतस्थळांच्या सोयी (Apps)

भाषिक मागणी केल्यास उत्पादन – सेवेत मिळणारे फायदे

  • ग्राहकांना उत्पादन – सेवेची इत्यंभूत माहिती मिळेल.
  • ग्राहकांच्या भाषेची बाजारपेठ विस्तारेल.‎
  • ‎बाजारपेठ विस्तारल्याने भाषिक रोजगार निर्माण होतील.
  • भाषेचा व्यवहारातील वापर वाढेल.

आपल्याला ग्राहक म्हणून मागणी करण्याचे अधिकार शासनाने दिलेले आहेत, त्याचा योग्य उपयोग करुन आपल्या उत्पादन – सेवेचा पूर्ण आनंद घ्या.

ग्राहकांच्या अधिकारासंबंधित अधिक माहिती आपण शासनाच्या खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर मिळवू शकता.

https://bit.ly/2OEIK4W

#ग्राहकअधिकार #भाषिकअधिकार #मराठी # #माझ्याभाषेतसेवाद्या#ServeInMyLanguage

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: