जनसामान्यांची भाषिक चळवळ

चळवळ 124
janasamanyanchi_chalaval

चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते.
“मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?”
“मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?”
“चळवळीतील सदस्य काय करतात?”

या लेखाद्वारे वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय.
मराठी बोला चळवळीला यापुढे लेखात फक्त “चळवळ” असं संबोधलं जाईल, ते ऐकायला – लिहायला सुटसुटीत आहे.

आधी पहिल्या आणि दुसऱ्या मुद्द्यांबद्दल बोलू
मराठी बोला चळवळीची स्थापना आजपासून सुमारे ५ वर्षांपूर्वी मराठी भाषेसाठी जागृत असलेल्या काही तरुणांनी समाजमाध्यमाद्वारे एकत्र येऊन केली, सुरुवातीला काही शे सभासद असलेल्या चळवळीतील सदस्यांची संख्या नंतर सहस्त्र आणि त्याहीनंतर दशसहस्त्राच्या घरात गेली. आज चळवळीच्या फेसबुक समूहात सुमारे ३५ सहस्त्राहूनही अधिक सदस्य आहेत. अधिकृत आणि सक्रिय सदस्यांची संख्याही काही सहस्त्राच्या घरात आहे. इतर समाजमाध्यमे उदा. ट्विटर, इंस्टाग्राम येथे चळवळीच्या विचारांना जोरदार प्रतिसाद मिळतोय.

कारण चळवळीचं उद्दिष्ट हे मराठी भाषा आणि संस्कृती टिकवणं आणि तिची वाढ करणं हे आहे. भाषा आणि संस्कृती या मानवी समाजाच्या अविभाज्य भाग आहेत, त्यामुळे या गोष्टींसाठी लोकाचेतना आवश्यक आहे, या गोष्टी लोकांद्वारे प्रामाणिकपणे येणं अपेक्षित आहे म्हणून राजकीय पक्ष आणि राजकारण यांचा संबंध नाही आणि तो सदैव नसेल.

एवढ्या लोकांची मोट बांधणारी चळवळ हि नेमक्या कशाच्या जोरावर फोफावतेय? त्यामागे काही संघटनांचा हात आहे का? चळवळीचे कोणी अर्धव्यू आहेत का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही अशीच आहेत. कारण चळवळीचं उद्दिष्ट हे मराठी भाषा आणि संस्कृती टिकवणं आणि तिची वाढ करणं हे आहे. भाषा आणि संस्कृती या मानवी समाजाच्या अविभाज्य भाग आहेत, त्यामुळे या गोष्टींसाठी लोकाचेतना आवश्यक आहे, या गोष्टी लोकांद्वारे प्रामाणिकपणे येणं अपेक्षित आहे म्हणून राजकीय पक्ष आणि राजकारण यांचा संबंध नाही आणि तो सदैव नसेल.
चळवळीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकं आहेत, पण सध्या शहरी भागातील लोकं जास्त आहेत कारण शहरी भागात मराठी बोलण्याचं प्रमाण घसरतंय (अर्थात त्याला अनेक कंगोरे आहेत त्यामुळे त्याच्या विश्लेषणासाठी संबंध लेख लिहावा लागेल), शासकीय यंत्रणेद्वारे मराठीची गळचेपी, मराठी शाळांना लागलेली ओहोटी, मराठी मनोरंजनाला प्राधान्य न देण्याची सवय या सर्व गोष्टी शहरी भागात जास्त आहेत.

चळवळीतील सदस्य काय करतात?
चळवळीतील सदस्य हे विविध माध्यमातून मराठीची जिथे जिथे गळचेपी होते, मराठीला दुर्लक्षित केले जाते अशा ठिकाणी मराठीला अग्रस्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांना यशही मिळतं इथे पहा प्रसारमाध्यमांत चळवळ .

चळवळीतील एक सदस्य हे स्थानिक यंत्रणेलाच जाब विचारत आहेत, स्थानिक यंत्रणेद्वारे मराठीचा प्रचार प्रसार आणि रक्षण अपेक्षित असताना त्याच मराठीची गळचेपी करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर यांची प्रतिक्रिया फारच रास्त आहे.

चळवळीतील आणखी सदस्य हे मराठी प्रसारमाध्यांतूनच मराठीत होणाऱ्या परभाषेतील शब्दांच्या अतिक्रमणाविषयी लिहितात. आणि हे अतिक्रमणच आहे कारण हे शब्द अवैध रीतीने मराठीत वापरले जात आहेत आणि हि गोष्ट मराठीच्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध आहे. अश्या या गोष्टींचा विरोध हा वेळीच व्हायला हवा.

चळवळीतील एका सदस्याने वसई पश्चिम येथील बिग बाजारात जाऊन तेथील तक्रार वहीत मराठीतून उद्घोषणा देत नसल्याची तक्रार केली. महाराष्टात मराठीतून व्यवहार अपेक्षित असताना केवळ लोकांच्या दुर्लक्षपणामुळे अनेक खाजगी कंपन्या मराठीचा वापर टाळतात. परंतु अशा जागरूक लोकांमुळेच आज मराठी टिकून आहे.

चळवळीतील एक सक्रिय सदस्य हे खाण्याच्या गोष्टी ऑनलाईन माध्यमातून घरपोच पोहचवणाऱ्या जगद्विख्यात कंपनी फूडपांडा ह्यांनाच सरळ प्रश्न विचारत आहेत.त्यांनी मागवलेलं अन्न घेऊन येणाऱ्या व्यक्तीला मराठी कळत नसल्याने त्यांनी ती ऑर्डरच रद्द केली, आता बरेच जण या गोष्टीला अतिरेकी म्हणतील, पण मराठीची गरज मारुन जर आपण व्यवहार करणार असू तर ती आपल्या समाजाचा आत्मा असलेल्या मराठीची प्रतारणाच ठरेल. त्यासाठी हा थोडा आग्रह योग्यच आहे.

चळवळीत हे एक सभासद नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी समाजमाध्यमात परभाषेचा वापर करुन सुरु असलेल्या मोहिमेला प्रश्न करत आहेत. जर या मोहिमेत महाराष्टातील लोकांचा सहभाग असेल तर मराठी नाव अपेक्षितच आहे.

आता, वरील सर्व प्रतिक्रियांवरून आपल्याला कल्पना आली असेल कि चळवळीत काम करणाऱ्या कोणी प्रसिद्द व्यक्ती नसून तुमच्याआमच्यातलेच आहेत. त्यांचा उद्देश हा सरळ आहे मराठीचा वापर वाढवणे.

या वरील प्रश्नाची उत्तरे दिल्यानंतर, एकच गोष्ट दिसून येईल कि मराठी बोला चळवळ हि जनसामान्यांची चळवळ आहे, हिचा कोणी पुढारी वगैरे नाही, प्रत्येकजण स्वतः पुढारी आहेत आणि त्यांनी पुढाकार घेऊन मराठीच्या वापराच्या वाढीसाठी प्रयत्न करायचाय. कारण मराठी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि जर महाराष्ट्रधर्म वाढवायचा असेल तर हा आत्मा टिकवणं आवश्यक आहे.

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

एका मराठी संवादाची गोष्ट!
कृपया पूढील संवाद लक्षपूर्वक वाचा👇 - हॅलो, भोसले सर बोलत आहात का? (हिंदीत सुरू) (इथं त्यांनी गृहीत धरलेय बरं का महाराष्ट्रात मराठी आडनावाच्...
मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: