दररोजच्या आयुष्यात आपण मराठीसाठी हे करू शकतो :

चळवळ चळवळीचे उपक्रम मराठीत मनोरंजन विशेष लेख हिंदी दडपशाही 100
मराठी बोलणे, मराठी लिहिणे, वाचणे,ऐकणे, पाहणे ह्यातून मराठीची बाजारपेठ वाढवणे,मराठीची व्यावसायिक पत वाढवणे हे आपल्या रोजच्या आयुष्यात करणे सहज शक्य आहे,
ह्यासाठी ना कुठं मोर्चा काढायचा आणि ना कुठं जाऊन उपोषण वगैरे करायचं आहे, गरज आहे ती फक्त मनाच्या निग्रहाची आणि मराठी वापरण्याची. आजच्या मराठी दिनापासून आपण हे करूया! मराठीचा अभिमान कृतीत आणूया!
आपल्या रोजच्या आयुष्यात कुठेही फार मोठा त्याग न करता आपण खालील काही गोष्टी सहज करू शकतो:
 • सार्वजनिक ठिकाणी, दुकानांत, शासकीय व खासगी कार्यालयांत आपण जिथे जिथे ग्राहक म्हणून जातो तिथे मराठीत बोलूया .मराठीत सेवा मिळवणे हा आपला मूलभूत ग्राहक हक्क आहे.
 • विमा कार्यालय, विमानतळ , रेल्वेतळ, बँका , टपाल, अश्या ठिकाणी चौकशी करताना मराठीतच बोला , हिंदी हा मराठीला पर्याय नाही हे निक्षून सांगा.
 • जिथे जिथे मराठी दिसत नाही त्याबद्दल तिथल्या तिथे रीतसर तक्रार करा, वर्तमानपत्रांत लिहा,मराठी बोला चळवळ फेसबुक समूहात कळवा.
 • मराठी चित्रपट, मराठी गाणी , मराठी मालिका ह्यांना पहिली पसंती द्या.
 • विविध कंपन्या, सेवा,सुविधा ह्यांच्याकडून येणाऱ्या फोनवर मराठीतच बोला, रोजच्या व्यवहारात मराठीच वापरा.
 • आपला फोन, आणि फेसबुक,गूगल् , ट्विटर् इत्यादी सोयी मराठीत वापरा , हे मराठीत वापरणे सोपं आणि सुंदर आहे.
 • फोनवरील सोयी (apps) मराठीत नसतील तर त्यांना कमी गुण देऊन मराठीत द्या अशी स्पष्ट मागणी करा.
 • मातृभाषा हे शिकण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे ,मुलांना मराठी माध्यमात शिकवा.
 • वाढदिवसाला मराठी पुस्तके भेट द्या , जेणेकरून एक फिरतं ग्रंथालय उभं राहील.
 • ज्या संस्था आणि व्यक्ती मराठीसाठी चांगलं काम करतात त्यांचं अभिनंदन करा!
 • जे अमराठी लोक नव्याने शिकून मराठी बोलत आहेत त्यांना प्रोत्साहन द्या.
 • मराठी बोलणाऱ्या विक्रेत्यांशीच व्यवहार करा.
 • आपल्या आवडीचे विषय, माहिती, ब्लॉग मराठीतून लिहा.
 • मराठीचा आग्रह धरणाऱ्या लेख, बातम्या , मतं-मतांतरं ह्यांना समाज माध्यमांत #मराठीबोलाचळवळम्हणजे ह्या जोडणीसह सामायिक करा, म्हणजे आम्ही ते पुढे पाठवू शकू.
हि यादी अजूनही पुढे वाढू शकेल! आपल्या मनात काही असल्यास  तेही सुचवा, त्याचा समावेश आपण ह्या यादीत नक्की करू!
वरील फलक आपण २०१७ ह्यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वापरला होता!
mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

होळीची माहिती - होळी म्हणजे रंग खेळायचा सण नव्हे!
होळी म्हणजे रंग खेळायचा सण नव्हे! मराठी संस्कृतीत होळीच्या दिवशी होळी जाळण्याला महत्त्व आहे, त्याविषयी थोडी माहिती,   माघी पौ...
मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
मध्य प्रदेशातल्या भाषांचं काय झालं ?
दोन दिवसापूर्वी इंदौरवरून नागदाला जायचा योग आला. त्यावेळेस मध्यप्रदेशातील मूळ भाषा कोणती हि काहीदिवसांपूर्वी फेसबुकवर घडलेली चर्चा चांगलीच लक्षात...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: