मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?

चळवळ 34
marathi_aagrahaa

बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्यांच्या भाषाही समान, हिंदी राष्ट्रवाद हा ह्या देशाचा कान होऊ शकत नाही, त्याचमुळं मराठीची मागणी, मराठी वापरणे आणि मराठी वाढवणे ह्या गोष्टी चुकीच्या अजिबात नाहीत, उलट आवश्यकच आहेत.

गुलामगिरीची भावना वाढीस लागली की स्वाभिमान हाच दुराग्रह वाटू लागतो, तसंच काहीसं मराठीच्या अग्रहाबाबत होत आहे का?

मराठीचा आग्रह आपल्या ह्या स्वतंत्र देशात चुकीचा कसा ठरवला जाऊ शकतो? इतर कोणत्याही भाषेइतकी मराठी हि सुद्धा भारतीय भाषाच आहे, मराठीचा इतिहास हा इथल्या मातीचा इतिहास आहे, मराठी हि ह्या भूमीची प्राचीन भाषा आहे, त्यामुळं मराठीचं संवर्धन हि खरंतर इथल्या लोकांची आणि लोकराज्याचं कर्तव्यच असायला पाहिजे, त्याशिवाय आपला देश काही भाषिक आधारावर स्थापन झालेला नाही , महाराष्ट्र मात्र मराठी ह्या एकमेव भाषिक आधारावर स्थापन झालेला आहे, स्वतःच्या भाषेत सेवा मिळवायचा , स्वतःची भाषा जपायचा आणि वाढवायचा पूर्ण अधिकार भारताचे नातेवाईक ह्या न्यायाने आपल्याला समस्त मराठी भारतीयांना आहे, हा घटनादत्त अधिकार आहे. स्वभाषाच नसेल तर ते स्वराज्य कसले? मग हे असं सगळं न्याय्य आणि घटनाशीर असताना मराठीचा आग्रह धरला कि देश तुटण्याची भाषा का केली जाते? मराठी वाढवणे हे खरंतर देशकार्य म्हणून गृहीत धरणे अपेक्षित असताना ते देशविघातक म्हणण्यात काय अर्थ आहे? ह्याचा उगम कुठेतरी हिंदी एकाधिकारशाही ह्या तत्त्वावर भारताची मांडणी ह्या हिंदी राष्ट्रवादात आहे, बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्यांच्या भाषाही समान, हिंदी राष्ट्रवाद हा ह्या देशाचा कणा होऊ शकत नाही, त्याचमुळं मराठीची मागणी, मराठी वापरणे आणि मराठी वाढवणे ह्या गोष्टी चुकीच्या अजिबात नाहीत, उलट आवश्यकच आहेत.

लेखक: मायबोली चमू

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
चळवळीतले अनुभव - थाना नव्हे ठाणे!
थाना नव्हे ठाणे प्रसंग लोकल वारीचा वेळ रात्री१०-१५ ची स्थानक- कांजूरमार्ग मुंबई माझे स्थानक भांडूप येणार म्हटल्यावर मी ठाणे गाडीत...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: