हिंदीच्या दडपशाहीविरोधी चळवळ उभी करावी लागेल
“चिं. वि. जोशींची भविष्यवाणी खरी ठरली” –
‘ चिं. वि. जोशी ‘ यांच्या ‘संचार’ या पुस्तकात, त्यांनी या पुस्तकात १९१४ ते १९४३ पर्यंतच्या तीस वर्षाच्या काळात केलेल्या प्रवासांचे वर्णन आहे.
१९४५ ला प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या प्रस्तावनेत , फार मोठे भाकीत केले होते, ते भाकीत आज किती खरे ठरले बघा!
#मराठी भाषेसाठी आज महाराष्ट्रात आपली #मराठीबोलाचळवळ उभी राहत आहे. जोशी किती दूरदर्शी असतील?
मराठी भाषेच्या आताच्या परिस्थितीला हिंदीच्या दडपशाहीसोबतच आपल्या लोकांची काही प्रमाणातील उदासीनता देखील तितकीच कारणीभूत आहे. तेव्हा मराठीजाणानीं आपला आळस आणि औदासिन्य झटकून मराठीच्या उत्कर्षासाठी काहीतरी करण्याची गरज आहे.