हिंदीमुळे विकास हा सर्वात मोठा गैरसमज

चळवळ 151

हिंदीमुळं भारताचा विकास होणार असेल तर हिंदी स्वीकारलेली उत्तरेची राज्ये मागास का?
हिंदीमुळं भारताचा विकास ह्या उठवळ वाक्याला काय अर्थ आहे?

उत्तरेतील २-३ राज्य वगळता हिंदी भाषिक राज्याचं दरडोई उत्पन्न हे आफ्रिका आणि आशियातील काही मागास देशांइतकं आहे. तरीही काही मंत्री हिंदीचे गोडवे गात असतात आणि हिंदीमुळेच लोकं एकत्र येतील आणि त्यामुळे देशाचा विकास शक्य आहे हे बरळत बसतात.

मुंबई शहरात क्षमता होतीच आणि त्यामुळेच तिचा विकास झाला उलट मराठी भाषा व्यवहारात जपत जर मुंबईचा विकास झाला असता तर तो सर्वांगीण असता कारण त्यात आपल्या महाराष्ट्री संस्कृतीची पाळंमुळं रुजली असती. मुंबई मराठी नाही असा प्रकार नाही पण आज मुंबईत हिंदी हि सर्वसामान्य लोकांची भाषा होऊ पाहतेय. अर्थातच त्याला कारणीभूत मराठी माणसाची मानसिकताच आहे. खाली एका मुंबईतील सामान्य मराठी माणसाचा दिनक्रम मांडला आहे, त्यातून आपल्याला परिस्थितीचा अंदाज येईल आणि मराठीवर भाषिक आक्रमण हि पोकळ वल्गना नाही हेही कळेल.

वर दाखवलेल्या तक्त्यात स्पष्ट दिसत आहे कि काही अपवाद वगळता हिंदीभाषिक राज्ये हि आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, तरीही बरेच मराठीजण मुंबई- महाराष्ट्राच्या विकासाचं श्रेय मुंबईतील लोकांनी विनासायास हिंदी स्वीकारली ह्याला देतात. आता मुंबईचं म्हणाल तर मुंबईचं क्षेत्रफळ अवघे ४०० चौरस किमी आहे, आणि जवळपास १२ लाख चौरस किमी क्षेत्रातील हिंदी स्वीकारलेला प्रदेश मागास आहे. त्यामुळे हिंदीमुळे मुंबईचा विकास हे विधान अगदी तर्कशून्य आहे. मुंबई शहरात क्षमता होतीच आणि त्यामुळेच तिचा विकास झाला उलट मराठी भाषा व्यवहारात जपत जर मुंबईचा विकास झाला असता तर तो सर्वांगीण असता कारण त्यात आपल्या महाराष्ट्री संस्कृतीची पाळंमुळं रुजली असती. मुंबई मराठी नाही असा प्रकार नाही पण आज मुंबईत हिंदी हि सर्वसामान्य लोकांची भाषा होऊ पाहतेय. अर्थातच त्याला कारणीभूत मराठी माणसाची मानसिकताच आहे. खाली एका मुंबईतील सामान्य मराठी माणसाचा दिनक्रम मांडला आहे, त्यातून आपल्याला परिस्थितीचा अंदाज येईल आणि मराठीवर भाषिक आक्रमण हि पोकळ वल्गना नाही हेही कळेल.

  • सकाळी उठल्यापासून बॉलीवूड गाणी
  • समाजामध्यमातून हिंदी संदेश फॉरवर्ड करणे – वाचणे
  • घरातून बाहेर पडल्यावर रिक्षा/टॅक्सी/फेरीवाले यांच्याशी हिंदीत बोलणे
  • अॉफिसमध्ये हिंदी बोलणे – हिंदी गाणी ऐकणे
  • पुन्हा घरी येताना रिक्षा/टॅक्सी/फेरीवाले यांच्याशी हिंदी बोलणे.
  • घरी येऊन हिंदी बातम्या, हिंदी कार्यक्रम आणि एखादा चकचकीतपणा असलेला मराठी कार्यक्रम पहाणे
  • घरातल्यांशी मराठी – हिंदी – इंग्रजी भेसळयुक्त भाषा
  • पुन्हा समाजामध्यमात हिंदी – इंग्रजी मोठ्या प्रमाणात वापरणे
  • जुनी बॉलीवूड गाणी गुणगुणत झोपी जाणे.

आता हा दिनक्रम बघितल्यावर आपल्या जीवनात हिंदीचं बरंच आक्रमण झालंय हे दिसून येईल, आणि हि परिस्थिती बदलण्यासाठी आपल्या जीवनातून हिंदी हि कमी व बऱ्याच ठिकाणी वजा करणं आवश्यक आहे, आणि त्यासाठी आधी हिंदी कोणतीतरी मोठी भाषा, जोडणारी भाषा आणि त्यामुळेच विकास झालाय हे गैरसमज मनातून काढून टाकायला हवेत.

नकोच तो परभाषेचा नाद #मराठीबोलाचळवळ

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: