मध्य प्रदेशातल्या भाषांचं काय झालं ?

जागर विशेष लेख 11

दोन दिवसापूर्वी इंदौरवरून नागदाला जायचा योग आला. त्यावेळेस मध्यप्रदेशातील मूळ भाषा कोणती हि काहीदिवसांपूर्वी फेसबुकवर घडलेली चर्चा चांगलीच लक्षात होती. या अनुषंगाने अधिक माहिती मिळवण्याकरीता मी ड्रायव्हरशी चर्चा केली. चर्चेतून निष्पन्न झालेले मुद्दे असे आहेत.
१. माळवी ही मध्यप्रदेशात बोलली जाणारी प्रमुख भाषा आहे. खडी बोली (हिंदी) नाही.
२. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील खांडव्यापासून ते राजस्थानच्या हद्दीवरील निमच एवढ्या मोठ्या भूभागात माळवी बोलली जाते. माळवी आजदेखील गावागावात बोलली आणि शिकवली जाते.
३.मात्र इंदौर सोडा पण नागदासारख्या छोट्या शहरातून देखील ती हद्दपार झाली आहे.
४. नागदाच्या छोट्या रस्त्यावर देखील माळवीमध्ये एक पण बोर्ड दिसत नाही. सगळीकडे खडी बोलीमधील फलक दिसतात.
महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हा आम्हापैकी किती जणांना माळवी हि भाषा माहीत आहे? आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न आज माळवीची ही मरणासन्न अवस्था का झाली ?

अर्थात यामागे खूप मोठे राजकारण आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर महाराष्ट्र हे मराठी लोकांचे राज्य करण्यास काही लोकांचा विरोध होता. मोरारजी देसाई आणि जवाहर नेहरू हि त्यातील महत्त्वाची नावे. आणि प्रादेशिक अस्मिता नष्ट करणे हाच त्यामागील हेतू होता. एका प्रादेशिक अस्मिता नष्ट झाली कि राष्ट्रीय पातळीच्या पक्षांना जिंकून येणे सोपे जाते. अस्मिता संपली कि संस्कृतीही संपली हे सांगायला नकोच. पण सत्तेच्या हव्यासापुढे संस्कृतीला काय महत्व ? पण मध्य प्रदेशातील जनता इतकी जागरूक नव्हती . तिथे भाषावार प्रांत रचना झाली नाही. आज माळवा आणि माळवी दोन्ही नावे भूतकाळाच्या वाटेवर आहेत. अर्थात तिथे कोणताच प्रादेशिक पक्ष नाही. कॉंग्रेस आणि भाजपचेच राज्य. बरं निदान विकास तर व्हावा. तर मध्य प्रदेश हे भारतातील एक गरीब राज्य म्हणूणच ओळखले जाते. उलट भाषिक अस्मिता जपणारी राज्ये विकासाच्या वाटेवर बरीच पुढे गेली आहेत. एवढं सगळं लिहीण्यामागचे एकच कारण ! आपल्या पूर्वजांनी मराठी संस्कृतीसाठी बलिदान दिलंय. खडी बोलीचा भाषिक साम्राज्यवाद थांबवा. आपल्या महाराष्ट्रात घरात आणि घराबाहेर मराठीतच बोला. आपल्या संस्कृतीला जपा.

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

होळीची माहिती - होळी म्हणजे रंग खेळायचा सण नव्हे!
होळी म्हणजे रंग खेळायचा सण नव्हे! मराठी संस्कृतीत होळीच्या दिवशी होळी जाळण्याला महत्त्व आहे, त्याविषयी थोडी माहिती,   माघी पौ...
मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
दररोजच्या आयुष्यात आपण मराठीसाठी हे करू शकतो :
मराठी बोलणे, मराठी लिहिणे, वाचणे,ऐकणे, पाहणे ह्यातून मराठीची बाजारपेठ वाढवणे,मराठीची व्यावसायिक पत वाढवणे हे आपल्या रोजच्या आयुष्यात करणे सहज श...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: