चॅनल पॅकच्या नावाखाली मराठीची मुस्कटदाबी?

प्रसारमाध्यम मराठीची गळचेपी मराठीत मनोरंजन विशेष लेख 20
marathi channels

आपल्या माथी मराठी व्यतिरिक्त इतर भाषा मारून आपल्याकडून अधिक पैसे घेतले जात आहेत.
या वाहिन्यांचा हा नाठाळपणा फक्त महाराष्ट्रातच आहे. इतर बहुतांशी सर्व राज्यात ते तिथल्या भाषेप्रमाणे निवडीचं स्वातंत्र्य देत आहेत.
मग महाराष्ट्रात असं का?? कारण आपण आळस करू. हिंदी चालवून घेऊ. राष्ट्रभाषा या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ. आणि त्यांचं अनावश्यक भलं करू.

ट्रायने नवीन नियम आणले, पण त्यातून वाहिन्या #मराठी माणसांची कशी फसवणूक करत आहेत त्याबद्दल..

झी: एकूण मराठी वाहिन्या ४
त्यांची एकत्रित किंमत: ३१. १०
पॅकेजची किंमत: ४९ रुपये

झीच्या ४ वाहिन्यासाठी आपण मोजत आहोत ४९ रुपये. सरासरी १२.२५ रुपये.
———————
सोनी: एकूण वाहिनी १
किंमत: ४ रुपये
सोनी पॅकेजची किंमत: ३१ रुपये

एका मराठी वाहिनीसाठी आपण देत आहोत ३१ रुपये.

इकडे आपल्याला मराठी+इंग्रजी, मराठी+कार्टून, #मराठी+माहितीपर वाहिन्या असा काहीच पर्याय नाही.
————————————-

स्टार: #मराठी वाहिनी १
किंमत: ९ रुपये
स्टारच्या पॅकेजची किंमत: ४९ रुपये

म्हणजे फक्त स्टार प्रवाह साठी आपण देत आहोत ४९ रुपये.

विशेष म्हणजे आपल्याला स्टारचे मराठी+क्रीडावाहीन्या, मराठी+इंग्रजी असे पर्याय उपलब्ध नाहीत.
———————
झी #मराठी: १९ रुपये
झी टॉकीज: १२ रुपये
झी युवा: ४ रुपये
झी २४ तास : १० पैसे

स्टार प्रवाह: ९ रुपये

सोनी मराठी: ४ रुपये

कलर्स मराठी: १९ रुपये
न्यूज १८ लोकमत: २५पैसे

फक्त #मराठी वाहिन्या निवडल्यातर ६० रुपयेच्या आत अधिकच बजेट होत. बाकी आपण आपल्या आवडीप्रमाणे इंग्रजी चित्रपट, कार्टून, क्रीडा, माहितीपर वाहिन्या घेऊ शकतो. बऱ्याच वाहिन्या फ्री-टू-एअर पण आहेत.

पण तरीही आपल्या माथी मराठी व्यतिरिक्त इतर भाषा मारून आपल्याकडून अधिक पैसे घेतले जात आहेत.
या वाहिन्यांचा हा नाठाळपणा फक्त महाराष्ट्रातच आहे. इतर बहुतांशी सर्व राज्यात ते तिथल्या भाषेप्रमाणे निवडीचं स्वातंत्र्य देत आहेत.
मग महाराष्ट्रात असं का?? कारण आपण आळस करू. हिंदी चालवून घेऊ. राष्ट्रभाषा या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ. आणि त्यांचं अनावश्यक भलं करू.

यापेक्षा थोडे जागरूक व्हा आणि तुम्हाला हवं तेच घ्या. तेवढ्याच वाहिन्यांचे पैसे द्या.

#मराठीबोलाचळवळ
#ChannelsCheatsMarathiPeople

– विजय स्वामी

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
रयतेचा कौल - मुंबईत सार्वजनिक ठिकाणी किती मराठी वापरली जाते?
मराठी आमुची मायबोलीतर्फे संकेतस्थळावर हा पहिला कौल घेत आहोत, मुंबई हि मराठी महाराष्ट्राची राजधानी असल्याने पहिला कौल मुंबईशी संबंधित आहे, तेव्हा ...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: