मराठी आणि क्रिकेट!!

प्रसारमाध्यम 496

मराठी आणि क्रिकेटचे एक अतूट नाते आहे, महाराष्ट्राची राजधानी मुंबई हि क्रिकेटची पंढरी. भारतात क्रिकेटची सुरुवात सर्वप्रथम इथेच झाली. या मातीने क्रिकेटची अनेक रत्न घडवली ज्यांनी आपल्या देशाचं नाव या खेळात उच्च स्थानी नेलं.
क्रिकेटच्या समालोचनाची भाषा सुरुवातीला इंग्रजी होती कारण हा साहेबांचा खेळ. स्वातंत्र्योत्तर काळात केंद्र शासनाने केलेल्या हिंदीच्या प्रचारामुळे हिंदीतही समालोचन होऊ लागलं. ९० च्या दशकापर्यंत दुरदर्शन बव्हंशी केंद्राच्या हाती असल्याने केवळ हिंदी आणि इंग्रजी या भाषांनाच जाहिराती, प्रसारमाध्यमांत महत्त्व होतं. ९० च्या दशकात झालेल्या आर्थिक शिथीलकरणामुळे अनेक खाजगी कंपन्या या क्षेत्रात कार्यरत झाल्या आणि त्यांनी स्थानिक भाषेतही प्रसारमाध्यमांच्या सेवा पुरवण्यास सुरुवात केली. अर्थात, मराठी त्यात मागेच होतं. दक्षिण भारतीयांनी मात्र त्या कालावधीत आपली बाजारपेठ भरपूर मोठी केली.

मराठी भाषेत या गोष्टींची सुरुवात २१ व्या शतकाच्या सुरुवातीला झाली तरीही ते सौम्य स्वरुपात होतं. मराठी माणसांसाठी मराठीला प्राधान्य कधीही नव्हते त्यामुळे मराठी मनोरंजन जरी वाढत होते तरी त्या तुलनेत इतर भाषांतील मनोरंजन अजून जास्त विस्तारत होते, याला कारणीभूत मराठी लोकांची मराठीला प्राधान्य न देण्याची मानसिकता होती.

आजमितीस मराठी भाषेत अनेक सेवा उपलब्ध आहेत पण त्या इतर बाजारपेठेच्या तुलनेत त्रोटकच आहेत. छापील माध्यमात मराठीची स्थिती बरी आहे पण आताच्या काळातील लोकांच्या पसंतीच्या इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमात मराठी भरपूर मागे आहे. ह्याचं मुख्य कारण म्हणजे मराठी माणसांची इतर भाषेतील मनोरंजनाला प्राधान्य देण हे आहे.


आत्ता पुन्हा क्रिकेटकडे वळू, क्रिकेट हा जरी खेळ असला तरी त्याला आता मनोरंजनाचं स्वरुप आलं आहे आणि त्याचं असं स्वरुप करण्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा मोठा वाटा आहे आणि या खेळातील रंजकता वाढवण्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे समालोचन. क्रिकेट समालोचनातही गेली अनेक दशकं इंग्रजी – हिंदीची मक्तेदारी होती, पण मातृभाषेतील लोकांच्या मनाच्या जास्त जवळ जाता येते म्हणूनच अनेक कंपन्यांनी तामिळ, तेलुगू, कानडी, बंगाली इत्यादी भाषांत खेळ वाहिन्यांची सेवा उपलब्ध करुन दिली. पण ज्या राज्याने क्रिकेटची मुहुर्तमेढ रोवली, ज्या राज्याने देशाला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू घडवून दिले, ज्या राज्याची भाषा जाणणारे सर्वाधिक समालोचक आहेत, जिथे स्थानिक ठिकाणी मराठीतच समालोचन करतात त्याच राज्याच्या भाषेत आज मराठी खेळ वाहिनी उपलब्ध नाही. तामिळ, कानडी लोकसंख्या मराठी लोकसंख्येपेक्षा कितीतरी कमी आहे पण त्यांना त्यांच्या भाषेत त्या सेवा मिळतात. कारण, ते त्या सेवांचा लाभ घेतात.
आपणही मराठीत सेवा मिळवण्याची मागणी करु. परंतु, सेवा मिळाल्यानंतर तिचा वापर करणे आणि वाढवणे हे आपल्या हातात आहे. कारण, आपण जर सेवा वापरत राहिलो तरच ती उपलब्ध राहणार. याआधीही अनेक कंपन्यांनी मराठीत सेवा सुरु केल्या होत्या परंतु, अपुऱ्या प्रतिसादामुळे त्या बंद कराव्या लागल्या. आता असं व्हायला नको म्हणून आपण आधी लोकांच्या मनात मराठी मनोरंजनाचा विचार रुजवणं आवश्यक आहे. आता भ्रमणध्वनीत इंटरनेटची सोय असल्याने समाजामध्ये बोटाच्या अग्रभागावर उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग करुन आपण आपल्या भाषेचं मनोरंजन आणि जीवनातील सर्व गोष्टीतील महत्त्व पटवून देऊ शकतो. फक्त एकच गोष्ट आहे की आपणही प्रामाणिकपणे ती गोष्ट आचरणात आणायची. हे एवढे केले तर काहीच अशक्य नाही.

#मराठीतमनोरंजन #मराठी #मराठीबोलाचळवळ#स्टारस्पोर्ट्समराठी

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

एका मराठी संवादाची गोष्ट!
कृपया पूढील संवाद लक्षपूर्वक वाचा👇 - हॅलो, भोसले सर बोलत आहात का? (हिंदीत सुरू) (इथं त्यांनी गृहीत धरलेय बरं का महाराष्ट्रात मराठी आडनावाच्...
मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
स्वतंत्र देशात मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: