मराठी प्रेक्षकांची मराठी मनोरंजनासाठी उदासीनता

मराठीत मनोरंजन 18

काला (Kaala) नामक तामिळ चित्रपट येतोय. दोन मराठी सुपरस्टार आहेत (रजनीकांत आणि नाना पाटेकर) आणि चित्रपट येतोय तामिळ्, तेलुगु आणि हिंदी भाषांत. काय अवस्था केली आहे आपण आपल्या भाषेची? त्याला बाजारपेठच नाही. कोणालाही त्या भाषेत कलाकृती का आणाव्याशा वाटत नाही?
आता कोणी म्हणेल की हा दोष रजनीकांत किंवा नाना पाटेकर ह्यांचा आहे, त्यांना मराठीबद्दल अभिमान नाही. तर तसं काही नाही. त्यांनीही चित्रपटाच्या निर्मितीसाठी पैसा मोजला आहे आणि त्यांना ठाऊक आहे की हा चित्रपट मराठीत आणला तरी अनेक लोकं तो हिंदीतूनच पाहणार. आणि त्यांचे त्यासाठीचे श्रम मातीमोल ठरणार, मग त्यांची तरी काय चूक?

मनोरंजनाची भाषा मराठी का नाही? ह्याला कोण जबाबदार आहे? मराठी माणसाने ह्याचे आत्मपरीक्षण करावे. जे बाजारात दिसतं तेच चालतं आणि तिथेच आपली भाषा दिसत नाही.
तेव्हा! उठा मराठीजणांनो, आणि आपल्या भाषेतील मनोरंजनाला प्राधान्य द्या. जग तुमच्यासाठी सर्व मराठीतून आणेल.

#मराठीतमनोरंजन #मराठीबोलाचळवळ #मराठी #म #Kaala

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

होळीची माहिती - होळी म्हणजे रंग खेळायचा सण नव्हे!
होळी म्हणजे रंग खेळायचा सण नव्हे! मराठी संस्कृतीत होळीच्या दिवशी होळी जाळण्याला महत्त्व आहे, त्याविषयी थोडी माहिती,   माघी पौ...
मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
दररोजच्या आयुष्यात आपण मराठीसाठी हे करू शकतो :
मराठी बोलणे, मराठी लिहिणे, वाचणे,ऐकणे, पाहणे ह्यातून मराठीची बाजारपेठ वाढवणे,मराठीची व्यावसायिक पत वाढवणे हे आपल्या रोजच्या आयुष्यात करणे सहज श...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: