विशेष लेख – दसऱ्याला सीमोल्लंघन करु!!

विशेष लेख 65
simolanghana

मायबोलीतर्फे सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!!

मित्रांनो!! आज दसरा, महाराष्ट्रात दसऱ्याला सीमोल्लंघन करतात, मित्र- आप्तेष्टांना भेटतात, गोडधोड स्वयंपाक करतात, सरस्वतीचे पूजन होते, शमीपत्रांच्या रुपाने सोनं लुटतात. ह्यातील बऱ्याच प्रथा अजूनही अबाधित आहे आणि त्याचं श्रेय महाराष्ट्रातील संस्कृतीकरक्षक मराठी रयतेलाच जातं. महाराष्ट्राने त्याची संस्कृती तर बऱ्यापैकी टिकवली आहे पण संस्कृतीतील एक महत्वाची गोष्ट म्हणजे भाषा. भाषा हा संस्कृतीचा एक अविभाज्य भाग पण त्या भाषेतच हल्ली परभाषेचं आक्रमण होतंय (किंबहुना आपणच ते करुन घेतोय). मराठी कमी होतेय अशातला भाग नाही परंतु परभाषा हिंदी हि भरपूर वेगाने फोफावतेय, आणि हा वेग आपणच थांबवू शकतो. परभाषेत होणाऱ्या सर्व गोष्टींना मराठीत पर्याय आहेत ते आपण वापरायला हवेत. सार्वजनिक ठिकाणी, इतरांशी बोलताना मराठी वापरायला हवी. मराठीत सोयी देणाऱ्या वेबसाईट, ऍप्प हे मराठीतूनच वापरायला हवं, मनोरंजनात मराठीलाच प्राधान्य द्यायला हवं.

मराठी वापरण्याचा मुद्दा हा केवळ भावनिक नसून व्यवहाराचाही आहे, भाषा हि व्यवहारात असेल तरच टिकेल, ती जर व्यवहारात असेल तरच ती अभिव्यक्ती, शिक्षण, मनोरंजन या गोष्टीत टिकून राहील आणि वाढेल. ती चार भिंतीपुरती मर्यादित ठेवली तर तिची वाढ खुंटेल आणि तजेला कमी होईल आणि त्यामुळे आपसूकच लोकं पर्यायी भाषेकडे वळतील आणि ह्यात मराठी आणि महाराष्ट्राचं सर्वात मोठं नुकसान आहे कारण ह्यातून स्वतःची ओळख पुसली जाण्याचा धोका आहे. जी समृद्ध भाषिक परिसंस्था विकसित होण्यासाठी सहस्त्रावधी वर्षांचा कालावधी लागला ती एक साधीसुधी गोष्ट नाही, ती एक अनमोल ठेव आहे जिची आपल्याला जपणूक करुन त्यात भर घालायची आहे.

गेल्या अनेक दशकात मराठी रयतेने स्वतःला अनेक गोष्टींपुरती मर्यादित करुन घेतलंय ( विशेषतः मराठी भाषेला), मराठी भाषा हि मराठी लोकांपुरती मर्यादित ठेवली आहे, या मर्यादेचं सीमोल्लंघन व्हायलाच हवं, मराठीला मर्यादेच्या पिंजऱ्यातून बाहेर काढून महाराष्ट्रात सर्वव्यापी करायलाच हवं.

गेल्या अनेक दशकात मराठी रयतेने स्वतःला अनेक गोष्टींपुरती मर्यादित करुन घेतलंय ( विशेषतः मराठी भाषेला), मराठी भाषा हि मराठी लोकांपुरती मर्यादित ठेवली आहे, या मर्यादेचं सीमोल्लंघन व्हायलाच हवं, मराठीला मर्यादेच्या पिंजऱ्यातून बाहेर काढून महाराष्ट्रात सर्वव्यापी करायलाच हवं.

चला तर मग संकल्प करुयात, मराठी बोलूयात, पाहुयात, वापरुयात  महाराष्ट्राला १००% मराठी करुयात!!

मायबोलीच्या दसरा उपक्रमाबद्दल माहिती घेण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा

https://bit.ly/2NMAU4p

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: