होळीची माहिती – होळी म्हणजे रंग खेळायचा सण नव्हे!

मराठी संस्कृती महाराष्ट्र विशेष लेख 5
होळी म्हणजे रंग खेळायचा सण नव्हे!
मराठी संस्कृतीत होळीच्या दिवशी होळी जाळण्याला महत्त्व आहे, त्याविषयी थोडी माहिती,
 
माघी पौर्णिमा, म्हणजे उत्सवाआधी एक महिना गावाच्या मध्यभागी एरंडाची एक फांदी पुरतात आणि होळीची मुहूर्तमेढ रोवतात. फाल्गुन शुद्ध पंचमीपासून होळीसाठी लाकडे, गोवऱ्या, पेंढा इ. जमा करावयास आरंभ होतो. हे सर्व जळाऊ साहित्य चोरून आणायचे असते. होळी जळून गेल्यानंतर दुधातुपाचे शिंपण तिच्यावर करून शांत केली जाते. होळीची राख दुसऱ्या दिवशी विसर्जित केली जाते. होळीच्या पाठोपाठ धूळवड आणि रंगपंचमी येते. रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर पिचकाऱ्यांनी रंग फेकला जातो.
ह्या सणाच्या संदर्भात भविष्यपुराणा त ढूंढा राक्षसिणीची कथा आलेली आहे. ती अशी : ही राक्षसीण गावात शिरून मुलांना त्रास देत होती. गावकऱ्यांनी तिला घाणेरड्या शिव्या देऊन मोठा अग्नी पेटवला आणि तिला पळवून लावले. होळीच्या उत्सवात बोंबा मारून अश्लील शब्द उच्चारतात, ह्याचे मूळ ह्या कथेत सापडते.

कोकणात ह्या सणाला शिमगा किंवा शिमगो असे म्हणतात , ह्यादिवशी अनेक ठिकाणी जत्रा असते आणि ग्रामदेवतांच्या पालख्या नाचवल्या जातात.

 


होळीच्या दुसऱ्या दिवशी मराठी संस्कृतीत धुळवड सण साजरा केला जातो,
महाराष्ट्रात या दिवशी चिखल फेकण्याची चाल होती. होळीचे पवित्र भस्म अंगाला लावणे, यातून ही चाल आली असावी; परंतु कालांतराने अश्लील शब्द उच्चारून शंखध्वनी करणे यासारख्या विकृत गोष्टीही या उत्सवात शिरल्या. शिमगा वा होळी पोर्णिमा या सणातच धुळवडीचा अंतर्भाव होतो. होळी पोर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत होळीचा सण मानला जातो. होळीचे भस्म लावणे व आंब्याचा मोहोर खाणे, हे या उत्सवातील धार्मिक विधी आहेत.
या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून लोक आनंदोत्सव साजरा करीत असल्यामुळे या पंचमीला ‘रंगपंचमी’ हे नाव प्राप्त झाले आहे. या प्रसंगी विविध रंगांची चूर्णे पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यांमधून एकमेकांच्या अंगावर उडविले जाते.
रंग उडविण्याचा उत्सव महाराष्ट्रात फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जात असला, तरी उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.

लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी सासुरवाडीकडून जावयाचे जे बारा सण साजरे होतात, त्यांमध्ये रंगपंचमीचा अंतर्भाव आहे. त्या दिवशी नववधूला केशरी रंग उडविलेली नवी साडी सासरकडून मिळते. मराठ्यांच्या कारकीर्दीत सरदार वगैरे प्रतिष्ठित लोक रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी करीत असत, असे शाहीर वगैरेंच्या वर्णनावरून दिसते. रंगपंचमीनिमित्त भरलेल्या दरबारात छोट्या जिजाईने पाच वर्षे वयाच्या शहाजी भोसले यांच्या अंगावर गुलाल उधळल्यामुळे त्यांचे पति-पत्नीचे नाते सूचित होऊन पुढे त्यांचा विवाह झाला, अशी वर्णने शाहिरांनी केली आहेत. काही ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी ‘बगाड’ घेण्याची पद्धत आहे.

प्रतीकात्मकरित्या होळीच्या ह्या सणाला आपल्या मनातील नकारात्मकता,समजुती काढून टाकून पुढे जाणे ह्याला महत्त्व आहे, मराठीच्या मुळावर येणारे सगळे गैरसमज होळीच्या निमित्ताने जाळून टाकूया! मराठीचं आणि पर्यायाने आपलं भविष्य उज्ज्वल करूया…

 
संदर्भ: मराठी विश्वकोश
mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
दररोजच्या आयुष्यात आपण मराठीसाठी हे करू शकतो :
मराठी बोलणे, मराठी लिहिणे, वाचणे,ऐकणे, पाहणे ह्यातून मराठीची बाजारपेठ वाढवणे,मराठीची व्यावसायिक पत वाढवणे हे आपल्या रोजच्या आयुष्यात करणे सहज श...
मध्य प्रदेशातल्या भाषांचं काय झालं ?
दोन दिवसापूर्वी इंदौरवरून नागदाला जायचा योग आला. त्यावेळेस मध्यप्रदेशातील मूळ भाषा कोणती हि काहीदिवसांपूर्वी फेसबुकवर घडलेली चर्चा चांगलीच लक्षात...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: