गोष्ट ‘अमोद झा’ ह्याची! – मराठी कोण असतो?

चळवळीचे कार्यकर्ते व्हिडिओ 101

गोष्ट ‘अमोद झा’ ह्याची!

बिहारमधील मिथिलांचल भागातील, सीतामढी तालुक्यात असलेल्या कुरियाई गावात १९८९ साली अमोद झा याचा जन्म झाला. बालपणीची सुमारे १० वर्षे गावी वास्तव्य केल्यानंतर आणि तेथे प्राथमिक शिक्षण झाल्यावर २००० च्या सुमारास काही अपरिहार्य कारणामुळे त्याला मुंबईला यावे लागले. घरची परिस्थिती बरी होती. दोन्ही वेळेचं जेवायला व्यवस्थित मिळत होता. तरीही आयुष्य संघर्षमय होते. दिवसामागून दिवस जात होते. अमोदने शालेय शिक्षण पूर्ण केले आणि तो गोरेगाव येथील वर्दे पाटकर महाविद्यालयात विज्ञान शाखेत दाखल झाला. जात्याच हुशार असलेल्या अमोदला शैक्षणिक बुद्धिमतेबरोबर चांगल्या निरीक्षणशक्तीचीही देणगीही मिळाली होती, मुंबईत आल्यावर आयुष्य दगदगीचं असतानाही तो आवर्जून मराठी शिकला!
अमोद हा शैक्षिणक गोष्टींबरोबरच कलेतही बराच हुशार होता, त्याच्या दुर्दैवाने त्याला मोठ्या कलाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही पण तो हताश झाला नाही त्याने बाहेरून कलेचा अभ्यास सुरूच ठेवला. चित्रकलेबरोबरच, संगीत आणि वाङ्मय या गोष्टीतही त्याला रस होता. महाविद्यालयात असताना तो एका इस्टेट एजन्टकडे नोकरीला लागला तेथे कागदपत्रांचं मराठीत भाषांतर करण्याच्या कामामुळे त्याच मराठीवरील प्रभुत्व अजून वाढल, त्याच सुमारास तो महाविद्यालयातील एकांकिकेच्या स्पर्धेत भाग घ्यायचा. एक मूळचा मराठी नसलेला पण मनाने मराठी असलेला माणूस हा असा असतो. त्याला आता कोणी अमराठी म्हणूच शकत नाही. एवढा तो महाराष्ट्राच्या संस्कृतीत सामावलाय. त्याच्या या मनस्वी मराठीपणाचं खरंच कौतुक करायला हवं.

आपण अनेकदा धकाधकीच्या आयुष्यात जगायलाच वेळ मिळत नाही, त्यातून व्यवहारात मराठी कमी चालली आहे असं म्हणत मराठीसाठी, मराठी कला, साहित्य इत्यादी छंद जोपासण्यासाठी तसेच मराठीचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळच मिळत नाही अशा काहीतरी सबबी सांगतो, आपल्यासाठी अमोदचं हे एक चांगलंच उदाहरण आहे! जर एक मूळचा मराठी नसलेला माणूस जगण्याचे प्रश्न सोडवत असतानाही मराठीसाठी वेळ काढू शकतो तर मग आपण का नाही?

आपण अनेकदा धकाधकीच्या आयुष्यात जगायलाच वेळ मिळत नाही, त्यातून व्यवहारात मराठी कमी चालली आहे असं म्हणत मराठीसाठी, मराठी कला, साहित्य इत्यादी छंद जोपासण्यासाठी तसेच मराठीचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळच मिळत नाही अशा काहीतरी सबबी सांगतो, आपल्यासाठी अमोदचं हे एक चांगलंच उदाहरण आहे! जर एक मूळचा मराठी नसलेला माणूस जगण्याचे प्रश्न सोडवत असतानाही मराठीसाठी वेळ काढू शकतो तर मग आपण का नाही?
आणि असे अनेक अमोद झा महाराष्ट्रात हवे असतील तर महाराष्ट्रात येणाऱ्या नव्या लोकांशी आवर्जून मराठीत बोलायचं, त्यांच्या मराठी बोलण्याचं स्वागत करायचं, जेणेकरून मराठी वाढण्यास हातभार लागेल. किमान एवढं तरी आपण नक्कीच करू शकतो!

जो महाराष्ट्रात राहून मराठी बोलतो, मराठी संस्कृती जपतो तो खरा मराठी.

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
चळवळीतले अनुभव - थाना नव्हे ठाणे!
थाना नव्हे ठाणे प्रसंग लोकल वारीचा वेळ रात्री१०-१५ ची स्थानक- कांजूरमार्ग मुंबई माझे स्थानक भांडूप येणार म्हटल्यावर मी ठाणे गाडीत...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: