हिंदीविषयी असलेले गैरसमज

हिंदी दडपशाही 93
hindiche_gairsamj

हिंदीबाबत आपल्याकडे अनेक चुकीच्या गोष्टी पसरलेल्या आणि रूढ झालेल्या आहेत.
पाहिलं म्हणजे आजच्या काळात हिंदी भाषा हि बरेच बदल झालेली खडी बोली हीच आहे. उत्तरेतली हिंदी हि खडी बोली आणि आपली ती हिंदी असं नाहीये.

भाषिक कुळातील स्थान

खडी बोली हि इंडो आर्य कुळातली एक भाषा आहे जी इंडो आर्य कुळाच्या मध्य शाखेत येते; मराठी दक्षिण शाखेत, गुजराती, राजस्थानी पश्चिम; गढवाळी, कुमावनी पहाडी शाखेत; तर भोजपुरी , बंगाली, असामी इत्यादी पूर्व गटात येतात, खडी बोली ह्या मूळ दिल्ली, मेरठ परिसरातील देशी भाषेवर फारशी प्रभाव होऊन उर्दू जन्माला आली. तिच्यात पुढे इतर भाषांचे शब्द येत गेले आणि तिला हिंदुस्तानी म्हणलं जाऊ लागलं (फारशी अक्षरांत लिहिलेली भाषा).

इस १९०० नंतर उत्तरेतील काही लोकांनी आपली मातृभाषा असलेल्या ब्रज, अवधी, भोजपुरी, राजस्थानी सोडून हिंदुस्तानीलाच पुढे आणलं, तिच्यात फारशी शब्दांऐवजी संस्कृत शब्द घालून (खरतर घुसवून) तिला हिंदी असं नाव दिलं, खडी बोलीचं हे रूप कोणत्याही माणसाची मातृभाषा नाही, पण उत्तरेतील धार्मिक तणावाच्या वातावरणामुळे हे रूप मोठ्या प्रमाणवर स्वीकारलं गेलं, खरतर हिंदुस्तानच्या (उत्तर भारताच्या) सगळ्याच भाषा ह्या हिंदी आहेत

हिंदुस्तानीचा उदय आणि त्याचं बळजबरी संस्कृतीकरण

पुढे इस १९०० नंतर उत्तरेतील काही लोकांनी आपली मातृभाषा असलेल्या ब्रज, अवधी, भोजपुरी, राजस्थानी सोडून हिंदुस्तानीलाच पुढे आणलं, तिच्यात फारशी शब्दांऐवजी संस्कृत शब्द घालून (खरतर घुसवून) तिला हिंदी असं नाव दिलं, खडी बोलीचं हे रूप कोणत्याही माणसाची मातृभाषा नाही, पण उत्तरेतील धार्मिक तणावाच्या वातावरणामुळे हे रूप मोठ्या प्रमाणवर स्वीकारलं गेलं, खरतर हिंदुस्तानच्या (उत्तर भारताच्या) सगळ्याच भाषा ह्या हिंदी आहेत पण संस्कृत शब्द घातलेल्या खडी बोली भाषेला हिंदी असंनाव देऊन भाषिक राष्ट्रीयत्व निर्माण करायचा प्रयत्न केला गेला, पण घटनेतील समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्य ह्या तीन मुलभूत तत्वांच्या अंगीकारामुळे, हिंदी भाषेच्या दादागिरीमुळे आणि स्वाभिमानी अहिंदी नागरिक विशेषतः तमिळ भाषिकांच्या विरोधामुळे हिंदी=भारत हे भाषिक राष्ट्रीयत्व तेवढ्यापुरतं टाळलं गेलं. पण ह्या अतिरेकाची मुळंअजूनही जिवंत आहेत आणि राष्ट्रभाषा, राजभाषा, संपर्कभाषा इत्यादी गोंडस नावं वापरून भारत = हिंदी हा समाज पसरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो.

-विशाल नाव्हेकर

mm

मायबोली प्रशासक

मराठी या आपल्या मायबोलीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट. आपणही मायमराठीच्या सेवेसाठी उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर विपत्र (ईमेल) पाठवा. marathibolachalawal@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

@marhathi यांनी घडवलेले
Xameo यांच्या प्रेमळ पाठिंब्याने

x

चुकवू नये असं काही!!

मी मराठी ग्राहक
मराठी भाषाही फक्त घराच्या चार भिंतीत बोलून वाढणार नाही. ती वाढवण्यासाठी व्यवहार मराठीतूनच केले पाहिजेत. मराठी भाषा पैश्याची भाषा म्हणून तिची भरभर...
मराठीचा आग्रह हा स्वाभिमान कि दुराग्रह?
बहुभाषिक असलेल्या आणि बहुभाषिक म्हणूनच एकत्र आलेल्या आपल्या ह्या संघराज्यात एकच भाषा ही देशाची ओळख कशी होऊ शकते? देशाचे सगळे नागरिक समान , तर त्य...
जनसामान्यांची भाषिक चळवळ
चळवळीबद्दल बरेचदा मराठीजणांची प्रतिक्रिया अशी असते. "मराठी बोला चळवळ हि राजकीय आहे का?" "मराठी बोला चळवळ कोणत्या पक्षाला पाठिंबा देते?" "चळवळी...
powered by RelatedPosts
%d bloggers like this: